‘भारत की छाप’ सहपुस्तिका

सगळंच काही चित्रपटाच्या माध्यमातून दाखवता येतं असं नाही. चित्रपटमालिकेतील निरनिराळ्या भागांमधील आशयाला विज्ञानविषयक चिंतनाची जोड मिळावी, वाचकांनाही विचाराला उद्युक्त करावं या हेतूने सहपुस्तकाची रचना झाली. सह-पुस्तकाचं लेखन केलं आहे चयनिका शाह, सुहास परांजपे व स्वातीजा मनोरमा यांनी. मालिकेतील पाच वार्ताहर पात्रं (अमृता, शहनाझ, रंजन, रामनाथन, रघू) व दोन अँकर पात्रं (मैत्रेयी व निस्सीम) यांचे चित्रपटमालिकेच्या त्या त्या भागाशी निगडित प्रश्नांबद्दलचे चिंतन किंवा त्यांनी त्याबद्दल दिलेली अधिक माहिती अशा स्वरूपाचे हे एकूण ५८ छोटेखानी लेख आहेत. यात अनेकोनेक प्रश्न हाताळलेले आहेत - विज्ञान म्हणजे काय पासून पाणिनीची सूत्रपद्धती काय होती इथपर्यंत अनेक प्रकारच्या प्रश्नांवर त्यात चिंतन आहे. चित्रपटमालिकेच्या संर्भात लिहिले गेले असले तरी हे लेख अशा तऱ्हेने लिहिले आहेत की सर्व पुस्तक मालिकेशी न जोडता स्वतंत्रपणे वाचता येईल. पुस्तकाचे मुखपृष्ठ व लेखांची अनुक्रमणिका सोबत जोडली आहे.


राजा मोहंती यांनी पुस्तकाची फार सुंदर रचना केली आहे. भरपूर छायाचित्रं आहेत. रंगीत मुखपृष्ठ व मलपृष्ठ आहे. हे आता एक दुर्मिळ पुस्तक म्हणून गणलं जातं.


जेव्हा चित्रपटमालिकेचा व्हिडियो संच विकला जायचा तेव्हा तेव्हा हे सहपुस्तक त्याबरोबर विनामूल्य दिलं जात होतं कारण त्याची किंमत संचाच्या किमतीत वसूल होत असे. आता आम्ही चित्रपटमालिका विनामूल्य देत असल्याने या पुस्तकासाठी आम्ही एक जुजबी किंमत आकारत आहोत.


पुस्तकाची  देणगी किंमत रु. २०० ठेवलेली आहे.


२ मार्चपर्यंत नोंदणी करणाऱ्यांना पुस्तक त्याच किमतीत पोस्टाने घरपोच पाठवले जाईल. नोंदणीसाठी पाठवायचे पैसे  तुम्ही खाली दिलेल्या माहितीच्या आधारे NEFT, GooglePay, BHIM, PayTM, अथवा अन्य UPI माध्यमांतून भरू शकता. पैसे भरल्याची पोचपावती (ऑनलाईन किंवा कागदोपत्री), किती प्रती हिंदी व/वा मराठी व पोस्टाचा संपूर्ण पत्ता  आमच्या इमेलवर (brahmegranthalaya@gmail.com) पाठवणे आवश्यक आहे.


पैसे भरण्यासाठी माहितीः

Account Holder’s Name: SHANKAR BRAHME SAMAJVIDNYAN GRANTHALAYA
Account Holder’s Address: 129 B/2, ERANDAWANE, PUNE - 411004
SB Account No.:  20062323577
Branch: ERANDAWANE, PUNE
Bank Name: BANK OF MAHARASHTRA
IFSC:  MAHB0000330