प्रकाशने

वाढत्या लोकसंख्येची भीती कोणाला?

किंमत (रु): 10.00

प्रकाशन वर्ष : 2016

पाने : 46

थोडक्यात परिचय : लोकसंख्या विस्फोट! लोकसंख्यातज्ज्ञ, फोर्ड फाउंडेशनचे तज्ज्ञ, नवमाल्थसवादी साऱ्यांची एकच हाकाटी सुरू आहे. लोकसंख्येचा बाँबस्फोट! तिसऱ्या जगातली वाढती लोकसंख्या जगातील नैसर्गिक संपत्ती संपवणार! जगाला विनाशाकडे नेणार! इत्यादी. पुस्तिकेच्या पहिल्या प्रकरणामध्ये भारतातील लोकसंख्या बदलाचा आढावा, राज्यनिहाय तफावत, लोकसंख्यावाढ व गरिबी, बेकारी यांचा संबंध काय आदी प्रश्नांचे विवेचन केले आहे. दुसऱ्या प्रकरणामध्ये पृथ्वीवरची नैसर्गिक संपत्ती कशी वापरली जात आहे? कोणासाठी वापरली जात आहे? जगातल्या सर्व जनतेला चांगले राहणीमान गाठणे शक्य आहे का? मग भीषण दुष्काळ का? लोकसंख्या ‘जादा’ आहे असे ठरविण्याचे निकष कोणते? लोकसंख्येचा भार केवळ लोकांची संख्या मोजून समजू शकतो की ते संवत असलेली संपत्ती व वाढवत असलेले प्रदूषण लक्षात घेऊन मोजला पाहिजे? अशा प्रश्नांची चर्चा केली आहे. ही पुस्तिका वाचकांना विचार करायला उद्युक्त करेल, लोकसंख्येच्या प्रश्नाकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहण्यास चालना देईल, हा प्रस्तुत पुस्तिकेचा हेतू आहे.