सुलभाताईंच्या जन्मदिनानिमित्त, फ्रान्सच्या ज्यूल्स व्हर्न पुरस्काराने सन्मानित विज्ञानचित्रपट मालिका ’भारत की छाप’ व त्याच नावाचे तिचे मराठी व हिंदीतील सह-पुस्तक उपलब्ध करून देत आहोत


आज २ फेब्रुवारी. सुलभाताईंचा जन्मदिन. दरवर्षी या दिवशी आम्ही त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या विचारांशी सुसंगत असा एखादा उपक्रम वा कार्यक्रम आयोजित करत असतो. या वर्षी त्यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही उपलब्ध करून देत आहोत, फ्रान्सच्या ज्यूल्स व्हर्न पुरस्काराने सन्मानित छंदिता मुखर्जी दिग्दर्शित हिंदी भाषेतील इंग्लिश सबटायटल्टसह विज्ञानचित्रपट मालिका ‘भारत की छाप’व त्याच नावाचे तिचे मराठी व हिंदीतील सह-पुस्तक. (कालांतराने मालिका आम्ही मराठी सबटायटल्ससह उपलब्ध करून देऊ.)

चित्रपट मालिका आम्ही विनामूल्य ऑनलाईन उपलब्ध करून देत आहोत, तर सह-पुस्तक जुजबी किमतीत घरपोच उपलब्ध करून देत आहोत. त्याबद्दलची माहिती खाली दिली आहे.

‘भारत की छाप’ चित्रपटमालिकेची माहिती व चित्रपटमालिकेच्या लिंक्स

‘भारत की छाप’ सह-पुस्तकाची माहिती